Skip to main content

एक छोटीशी संधी

                     

                                                    एक छोटीशी संधी एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकोप्तर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. 

तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकोप्तर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. 

मित्रानो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका.

Comments

Popular posts from this blog

अंधारात कसा चढणार डोंगर?’

                                                        अंधारात कसा चढणार डोंगर?’ तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने.... रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला....

मार्क झुकरबर्ग कोण आहे?

मार्क जकरबर्ग सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकचे सहसंस्थापक आणि सीईओ आहेत तसेच जगातील सर्वात तरुण अब्जाधिशांपैकी एक आहेत . मार्क झुकरबर्ग कोण आहे? 14 मे 1 9 84 रोजी न्यूयॉर्कच्या व्हाईट प्लेन्स येथे जन्मलेल्या मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकची स्थापना केली. साइटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी चौदा वर्षानंतर हार्वर्ड सोडले, ज्याचे वापरकर्ता आधार 2 अब्जांपेक्षा जास्त लोक बनले आहे, ज्यामुळे जकरबर्गला अब्जाधीश बनले होते. 2010 च्या फेसबुक द सोशल नेटवर्कमध्ये फेसबुकचा जन्म झाला. लवकर जीवन मार्क इलियट झकरबर्गचा जन्म 14 मे 1 9 84 रोजी व्हाईट प्लेन्स, न्यूयॉर्कमधील एका सुप्रसिद्ध, सुशिक्षित कुटुंबात झाला आणि जवळपासच्या डब्ब्स फेरी या गावात वाढला. त्यांचे वडील एडवर्ड झकेरबर्ग यांनी दैनंदिन सराव कौटुंबिक घरात संलग्न केले. त्याच्या आईने, कॅरन, दांपत्याच्या चार मुलांच्या जन्माआधी मनोचिकित्सक म्हणून काम केले- मार्क, रांडी, डोना आणि एरिले. झुकेरबर्ग यांनी लहानपणीच संगणकांमध्ये रस निर्माण केला; जेव्हा ते 12 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी "झुकेट" नावाचा मे...